नमस्कार मंडळी, CM Eknath Shinde New Update नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजप, शिवसेना – शिंदेगट, राष्ट्रवादी काँग्रेस – अजित दादा पवार गट यांनी बाजी मारल्याचे आपणाला दिसून येते.
सध्याच्या या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील या निकालावर भाजपचे वर्चस्व जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील पुढचा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सध्या रंगात आहे.
त्यापूर्वी तिन्हीही महत्त्वाच्या मंत्र्यांनी म्हणजेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन मागील राज्यातील कारकिर्दीचा राजीनामा सोपवला आहे.
दरम्यान आपण पाहतो की, महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यामुळे लवकरच ते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
पहा अधिक माहिती ▶▶
पुढचा मुख्यमंत्री कोण होणार ?
मुख्यमंत्रिपदाबाबत विविध तर्क वर्तवले जात आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री पद भाजपला मिळावे असे भाजप नेत्यांची मागणी आहे. तर ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्याने त्यांना मुख्यमंत्री करावे असे शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, भाजपलाच मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, त्यांनी आता राजीनामा दिल्याने लवकच मुख्यमंत्री पदाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.