नमस्कार मंडळी, शिंदे सरकारने चालू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Ladki Bahin Yojana योजनेला आता सहा महिने उलटून गेले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे आता ही योजना चालू राहणार की नाही? असा प्रश्न बहुतेकांच्या मनात पडलेला आहे.
कारण सरकार बदलल्यानंतर येणारे सरकार हे पैसे देणार की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. परंतु बहुमताने शिंदे सरकार म्हणजेच महायुतीचे सरकार आले आहे. आता या योजने अंतर्गत सहाव्या हप्त्याची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागलेली आहे. तर हा सहावा हप्ता कधी येणार? या योजनेतून १,५०० रुपये मिळणार की २,१००? शिंदे सरकारने नेमकं काय वचन दिले होते? जाणून घेऊया संपूर्ण माहिती..
लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार?
मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर आतापर्यंत १५०० रुपयांचे ५ हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. परंतु सध्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये पुढील हप्ता थांबवण्यात आला आहे. “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले.
लाडक्या बहिणींना डिसेंबर मध्ये किती रुपये मिळणार? १५०० की २१००
शासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभांवर विचार केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
दीड हजार की २१००? Ladki Bahin Yojana
पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार काय? अशीही बहिणींमध्ये चर्चा रंगत आहे.
दरम्यान, हा धोरणात्मक निर्णय असल्याने कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याने, डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो दीड हजारांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना डिसेंबर मध्ये किती रुपये मिळणार? १५०० की २१००